मुंबईराजकीय

MNS On Thackeray Government | ‘शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली असून स्वत:हून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS On Thackeray Government | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) निवासस्थानावर हनुमाना चालिसा (Hanuman Chalisa) पठणासाठी सांगितल्याप्रमाणे मुंबईत (Mumbai) दाखल झाल्या होत्या, मात्र शिवसेनेच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी सकाळी त्यांच्या निवासस्थानी जोरदार राडा केला. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं होतं. याचाच धागा पकडत मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. (MNS On Thackeray Government)

 

शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे. एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वत:हून राष्ट्रपती राजवटीचा (President’s Rule) मार्ग तयार करत आहेत, असा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भोंग्यांच्या (Loudspeaker On Masjid) मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. (MNS On Thackeray Government)

तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवलीत काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नकोय. आम्ही काय चुकीचं बोलतोय ?, न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री (CM) साहेब ?, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘मातोश्री’ च्या (Matoshree) परिसरात असलेल्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यासोबतच राज्यातील इतर काही घटनांमुळे भाजपच्या काही नेत्यांनी केंद्राकडे महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- MNS On Thackeray Government | mns leader sandeep deshpande tweet on shivsena and president rule in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button