MNS On Uddhav Thackeray | ’21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, ‘वर्षा’तला शेवटचा दिवस ?’ – मनसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS On Uddhav Thackeray | महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या राजकारणातलं मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सकाळपासून राज्यातील राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार सूरतमध्ये आहेत. दरम्यान शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवले. त्या जागी अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची नियुक्ती केली. दरम्यान एकूणच या घडामोडीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असतानाच भाजपमधून (BJP) शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केली जातेय. अशातच मनसेनेही शिवसेनेवर (MNS On Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

 

मनसे नेते अमेय खोपकर (MNS Leader Ameya Khopkar) यांनी शिंदेशाही अवतरली… असे ट्विट केले आहे. त्यानंतर, काही वेळातच त्यांनी आणखी एक ट्विट केलं. त्यामध्ये, “21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की “वर्षा” तला शेवटचा दिवस ?!!,” असं टिकात्मक सूचक ट्विट खोपकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनीही असेच ट्विट केले आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या स्थिरतेवर सवाल उपस्थित होताना दिसत आहे. (MNS On Uddhav Thackeray)

 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकनाथ शिंदेंसह आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तर, शरद पवार (Sharad Pawar), संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यासंदर्भात भाष्य केलं असून सध्या थांबा आणि पाहा,
असंच ते म्हणाले आहेत.
तसेच, भाजप नेतेही प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), नारायण राणे (Narayan Rane), प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मात्र या नेत्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदेंची नेमकी भूमिका काय असणार ? हे पाहावे लागणार आहे.

 

Web Title :-  MNS On Uddhav Thackeray | cm uddhav thackeray june 21 is the biggest day of the year or the last day of varsha mns on shivsena and eknath shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा