×
Homeताज्या बातम्याMNS On Uddhav Thackeray | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल टीका, म्हणाले...

MNS On Uddhav Thackeray | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल टीका, म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळ…’

मुंबई : MNS On Uddhav Thackeray | बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे वडील असले तरी ते संपूर्ण महाराष्ट्राची विचारधारा आहेत. बाळासाहेब ठाकरे ही एक व्यक्ती नाही तर विचार आहेत. विचारांवर कुणाचा हक्क नसतो. त्यामुळे तुम्ही कितीही ओरडला तरी ती विचारधारा सगळ्यांची आहे. त्यावर वैयक्तिक मालकी कुणाची नाही. दुसर्‍यांचे ओरबडून जगणारे हे बांडगुळ आहे. दसरा मेळावा कुणीही घेतला तरी बाळासाहेबांचे विचार ऐकायला मिळतील याची शाश्वती आहे का? असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटले आहे. (MNS On Uddhav Thackeray)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना संदीप देशपांडे यांनी म्हटले की, घरातील कमकुवत मुलावर आई वडिलांचे जास्त प्रेम असते. बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे हे बांडगुळ आहे. स्वत:चे कर्तृत्व शून्य. कोरोना काळात अडीच वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी ठेवली आणि कालच्या सभेत संजय राऊतांची (Sanjay Raut) खुर्ची रिकामी ठेवली. ज्यांचे स्वत:चे कर्तृत्व नाही त्यांना काय उत्तर देणार. (MNS On Uddhav Thackeray)

संदीप देशपांडे म्हणाले, 25 वर्षात पालिकेचा इतका पैसा खाल्लाय ते कधीतरी उघड होईल. ज्यावेळी ते समोर येईल तेव्हा व्यासपीठावरील अनेक खुर्च्या रिकाम्या राहतील. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणार होती. मग तेव्हा निवडणूक पुढे का ढकलली? सत्तेत असणारे निवडणुकीला का घाबरतात ते माहिती नाही. गुदगुदल्या केल्या तरी हे घाबरतील.

शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना देशपांडे म्हणाले, फक्त 4 खासदार तरी वाजवताय बाजा, पोरी पुरताच उरलाय साडेतीन जिल्ह्याचा राजा अशी पोस्ट आमच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी केली आहे. ही पोस्ट तंतोतंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर लागू होते.

देशपांडे पुढे म्हणाले की, विदर्भाचा दौरा समाधानकारक झाला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरेंच्या गाठीभेटी झाल्या. आगामी काळात मनसे प्रबळपणे विदर्भात वाढेल. 3 महिन्यात मनसेच्या 1 हजार शाखा विदर्भात उघडणार आहोत. दौरे सुरूच राहतील. 30 तारखेच्या आत विदर्भातील नवी कार्यकारणी पक्षाचे अध्यक्ष जाहीर करतील.

Web Title :-  MNS On Uddhav Thackeray | mns leader sandeep deshpande counter attack on shivsena uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना BMC चा नकार

Shambhuraj Desai | अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहीम राबवा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News