आयोध्येला गेलेल्या शिवसेनेवर मनसेची जोरदार पोस्टरबाजी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचा आणि मनसेचा वैचारिक बांधा हिंदुत्वाचा मुद्दा सोडला तर सारखाच आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या उट्टया काढून शिवसेनेची मतांच्या राजकारणाला डिवचण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या मनसे कडून करण्यात येतो आहे. मुंबई येथील शिवसेना मुख्यालयाच्या परिसरात मनसेने पोस्टर बाजी केली आहे. पोस्टरवर टाकलेले वाक्य खूपच समर्पक असून शिवसेनेला आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

अयोध्येत जाऊन राम मंदिराच्या प्रश्नावर हुंकार भरण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने केला जातो आहे. त्यानिमित्त त्यांनी मोठी फिल्डिंग अयोध्येत लावली असताना बालेकिल्ला मुंबई मध्ये मात्र त्यांची खेचण्याचा पूर्ण प्रयत्न महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. मनसे आणि शिवसेनेचा अस्तित्वासाठीचा संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही परंतु हे दोन्ही पक्ष रोज नव्या रूपाने आपसात भिडतात आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागच्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता संघर्षाला उद्देशून म्हणले होते कि , शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरतात. या मुद्यावरून शिवसेनेला सोशल मीडियाने चांगलेच खेचले होते. नंतर शिवसेनेनेही या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले होते कि, शिवसेनेत राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी सत्तेत राहते आहे. राजीनामे खिशात या मुद्द्याला धरून मनसेने चांगलीच राळ उडवण्याचा प्रयत्न केला आहे.

अयोध्येत विहिंप आणि शिवसेनेत रंगले पोस्टर युद्ध 
अयोध्या : अयोध्येत उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांच्या सोबत असलेला अयोध्या दौरा २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी पार पडत असतानाच विश्व हिंदू परिषदेचा धर्मसंसद कार्यक्रम एकाच वेळी येत असल्याने आता शिवसेना आणि विहिंप त्यांच्यात पोस्टर युद्ध रंगात आले आहे. अयोध्येकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवसेनेच्या वतीने १० मिटरच्या अंतरावर एक पोस्टर या प्रमाणे रस्त्यांच्या दुतर्फ़ा स्वागताचे पोस्टर झळकवण्यात आले असून विश्व हिंदू परिषदेच्या वतीनेही शिवसेनेच्या शेजारीच पोस्टर लावण्यात आल्याने अयोध्येत आता या पोस्टर युद्धाची चर्चा रंगात आली आहे.

२५ नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाला दोन लाख लोक येणार असल्याचे विहिंपच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर शिवसेना आणि विहिंपचे कार्यक्रम निर्विघ्न पार पडावे या साठी अयोध्यावासिय देवाकडे प्रार्थना करत आहेत.

जामा मशिदीच्या पायऱ्याखाली देवी देवतांच्या मूर्ती