मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या कमरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. यामुळे आजच्या आयोजित सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे उपस्थित राहू शकले नाही.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्वपक्षीय मंत्री, नेते उपस्थित आहेत. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहणार अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावतीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याने ते या बैठकीस उपस्थित राहू शकलेले नाहीत. या दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत.