मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महाराष्ट्राला हात जोडून विनंती, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की हे सगळं गांभीर्याने घ्या. हा लॉकडाऊन पाळला नाही आणि प्रकरण वाढत गेले तर दिवस वाढतील. दिवस वाढले तर यंत्रणेवर ताण येईल. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर ताण येईल. कर मिळणार नाही. याचा परिणाम उद्योगधंद्यावर होऊन नोकऱ्या जातील. हे सर्व आपल्या एका चुकीमुळं होणार आहे. लोकांना वाटतं काय फरक पडणार आहे. देशात अनेक अनेक माणसं मरत आहे. टीबी वगैरे रोगाने माणसं मरत आहेत. पण या रोगावर किमान औषध तरी आहे. पण कोरोनावर अद्याप औषध नाही. तसेच पुरेसे व्हेटिलेटर्स देखील उपलब्ध नाहीत, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे
मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपचार बंद करायला हवेत. यांना त्या दिवसांमध्ये देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असं कारस्थान करायचं असेल, नोटांना थुंका लावत आहेत, भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना फोडून काढून त्याचे व्हिडिओ व्हायरल करायला हवेत तर लोकांना विश्वास बसेल. तसेच धर्म वगैरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. आता लॉकडाऊन आहे, नंतर आम्ही आहोतच असे राज ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊन वाढवावाच लागेल
लॉकडाऊन काळात लोक ज्या पद्धतीने वागत आहेत आणि कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर लॉकडाऊन वाढवावाच लागेल. 14 तारखेला सर्व सुरळीत होईल असं मला वाटत नाही. सगळे घरात थांबले तरच वैद्यकीय अधिकारी, महापालिका कर्मचाऱ्यांना मदत मिळण्यास मदत होईल ते काय जेलमध्ये टाकणार नाहीत. इतरांना त्रास होऊ नये यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे. मला वाटतं समाजावर सर्वात मोठी जबाबदारी आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला देताना राज ठाकरे म्हणाले, मला सरकारवर टीका करायची नाही. आता ती योग्य वेळ नाही. परंतु ती यंत्रणा सरकारने लावायला हवी. भाजी मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले. सरकारने गर्दी होणार नाही तशी व्यवस्था केली पाहिजे. प्रत्येक विभागवार यंत्रणा राबवली पाहिजे. सरकार यंत्रणा राबत नाही असे नाही पण ती नीट केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.