पोलिसांवर हल्ले करणार्‍यांना फोडून काढा, त्यांचे व्हिडीओ व्हायरल करा ! जाणून घ्या राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ‘हे’ 6 महत्वाचे मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारसह नियम मोडणाऱ्या नागरिकांवर परखड भाष्य केले आहे. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे असे मत व्यक्त करत पोलिसांचं खच्चीकरण करून सध्या चालणार नाही. पोलिसांच्या चुका दाखवण्याची ही वेळ नाही. पोलीस 12 – 13 तास काम करत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर फक्त केसेस टाकून चालणार नाही तर त्यांना फोडून काढलं पाहिजे आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल केले पाहिजेत असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, मी एक व्हिडिओ पाहीला ज्यामध्ये घरातील लोकांनी मिळून पोलिसांना मारलं. भेंडी बाजारात पोलिसांना शिव्या घालण्यात आल्या, याचा व्हिडिओ आला आहे. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, यावर कडक पावलं उचलावी लागतील. याचा संदेश संपूर्ण समाजात जाण्याची गरज आहे. हे लपून छपून करण्यासारखं नाही. ज्याप्रकारे ही लोकं वागत आहेत त्यांना कशा प्रकारची शिक्षा मिळत आहे हे सर्वांना समजणं गरजेचं आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

लॉकडाऊनची शिस्त पाळा अन्यथा…
हा जो लॉकडाऊन आहे तो गांभीर्याने घ्यावा. लोकांना रेशन, भाजी असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करून देत आहे. पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉकडाऊन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होती. सरकारकडे कोणताही कर येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. अधीच 50 टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगतिलं.

लॉकडाऊन पाळणाऱ्यांच्या मनात भीती
राज ठाकरे पुढे म्हणाले की, जे लॉकडाऊन पाळत आहेत त्यांच्या मनात भीती आहे ती म्हणजे नोकरी राहणार का ? उद्या भाजीपाला मिळणार का ? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. जे शिस्त पाळत नाहीत त्याच्यामुळे हे घडत आहे. आजकाल प्रत्येक घरी एक डॉक्टर झाला आहे. कोणी सांगतं गोमूत्र प्या, कोणी सांगत लसूण खा, कांदा खा डॉक्टर काय उगाच मेहनत करत आहेत, जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत.

पंतप्रधान मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, सर्व डॉक्टर, शेतकरी, पोलीस, वीज-पाणी पुरवठा करणारे कर्मचारी सगळे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. पण लोकांना याचे गांभीर्य कळत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मी त्या दिवशी पंतप्रधानांचे भाषण ऐकलं, आता खरं तर वैद्यकीय यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जात आहे. मृतांचा नेमकी संख्या किती ? खरंच किती रुग्ण आहेत ? याबाबत संभ्रामावस्था आहे. ती दूर करण्याची जबाबदारी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीची असते. त्यांनी ती संपवायची असते, असे राज ठाकरे म्हणाले.

पंतप्रधानांनी दिवे लावण्यास सांगितले आहे. लोक काळोख करतीलही, नाही तरी घरात बसून काय करायचं आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय असेल, पण त्याच्याने काही होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत. पण नुसतं दिवे घालवून, मेणबत्या पेटवून, टॉर्च लावून याऐवजी त्यांच्या भाषणात आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असत. देश कुठे जात आहे, पुढे काय घडणार हे जनतेला समजले पाहिजे. उद्योगधंद्यांना दिलासा दिला नाही त्याचा परिणाम नोकऱ्यांवर होईल.

मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे
मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपचार बंद करायला हवेत. यांना त्या दिवसांमध्ये देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असं कारस्थान करायचं असेल, नोटांना थुंका लावत आहेत, भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना फोडून काढून त्याचे व्हिडिओ व्हायरल करायला हवेत तर लोकांना विश्वास बसेल. तसेच धर्म वगैरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पहिजे. आता लॉकडाऊन आहे, नंतर आम्ही आहोतच असे राज ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊन वाढवावाच लागेल
लॉकडाऊन काळात लोक ज्या पद्धतीने वागत आहेत आणि कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर लॉकडाऊन वाढवावाच लागेल. 14 तारखेला सर्व सुरळीत होईल असं मला वाटत नाही. सगळे घरात थांबले तरच वैद्यकीय अधिकारी, महापालिका कर्मचाऱ्यांना मदत मिळण्यास मदत होईल ते काय जेलमध्ये टाकणार नाहीत. इतरांना त्रास होऊ नये यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे. मला वाटतं समाजावार सर्वात मोठी जबाबदारी आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला देताना राज ठाकरे म्हणाले, मला सरकारवर टीका करायची नाही. आता ती योग्य वेळ नाही. परंतु ती यंत्रणा सरकारने लावायला हवी. भाजी मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले. सरकारने गर्दी होणार नाही तशी व्यवस्था केली पाहिजे. प्रत्येक विभागवार यंत्रणा राबवली पाहिजे. सरकार यंत्रणा राबत नाही असे नाही पण ती नीट केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.

राज्यातील जनतेला आवाहन
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी राज्यातील जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की हे सगळं गांभीर्याने घ्या. हा लॉकडाऊन पाळला नाही आणि प्रकरण वाढत गेले तर दिवस वाढतील. दिवस वाढले तर यंत्रणेवर ताण येईल. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर ताण येईल. कर मिळणार नाही. याचा परिणाम उद्योगधंद्यावर होऊन नोकऱ्या जातील. हे सर्व आपल्या एका चुकीमुळं होणार आहे. लोकांना वाटतं काय फरक पडणार आहे. देशात अनेक अनेक माणसं मरत आहे. टीबी वगैरे रोगाने माणसं मरत आहेत. पण या रोगावर किमान औषध तरी आहे. पण कोरोनावर अद्याप औषध नाही. तसेच पुरेसे व्हेटिलेटर्स देखील उपलब्ध नाहीत, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like