मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित यांना उपचारासाठी दाखल केलं लिलावती रूग्णालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच संकट अद्यापही टळल नाही. देशभरात कोरनाबाधितांचा आकडा 75 लाखांच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे काळजी घ्या, गरज असेल तरच बाहेर पडा, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप जाणवत होता. प्रामुख्याने त्यांची कोविड आणि मलेरीया चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे घाबरण्याच कारण नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आज सोमवारी (दि. 19) सकाळी अमित यांना वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे.

अमित यांनी कोरोना काळात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अंगणवाडी सेविकांचा प्रश्नही त्यांनी शासनदरबारी मांडला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळानेही अपुर-या वेतनाबाबत त्यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल होते. आरे येथील मेट्रो कारशेडबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा अमित ठाकरे यांनी स्वागत केले होते.