जलसंपदा मंत्री महाजन यांच्या वक्तव्याचा मनसेकडून निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्याबद्दल पूर्वग्रहदूषित ठेवून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुण्याच्या पाण्याचे ऑडिट करण्याविषयी बोलत आहेत. एकंदरीतच या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. पुण्यातील भाजपचे सात आमदार आणि आठवे आमदार पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात समन्वय नाही. या आमदारांनी पाण्याबद्दलचे वास्तव गिरीश महाजन यांच्यापुढे मांडले की नाही याची शंका येते.

पुणेकर भरमसाठ पाणी वापरतात असे बापट यांनीच महाजन यांना सांगितले का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. पुण्याच्या बहुतांश भागात प्रति माणशी दीडशे लिटर तरी पाणी पोहोचते का? टँकर माफिया कोणाच्या तिकीटावर निवडून आले आहेत? भाजपच्या पाठिराख्या धनदांडग्यांना पाणी कसे पुरवले जाते? याची माहिती महाजन यांना नाही का? असे प्रश्न उपस्थित करून मनसेने महाजन यांचा निषेध केला आहे.