शिरूरमध्ये वीजदरवाढी विरोधात मनसेकडून खळ’खट्याक’ !

शिक्रापुर : कोरोना संकट काळात मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला ज्यादा वीजबिल दिल्याच्या निषेधार्थ आज शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने शिरूर वीज वितरण कार्यालयात खळ खट्याक आंदोलन करत वीज कार्यालयातील अधिकाऱ्याच्य केबिनची तोडफोड करण्यात आली .अवाजवी वीज बिलाच्या विरोधात, शिरूर शहर मनसे व मनसे जनहित कक्ष यांनी वीजवितरण कंपनीची हंडी फोडली.या खळ खट्याक आंदोलनात मनसे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे, मनसे कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे आदी नी वीज वितरण कंपनीचे कार्यालयात घुसून आंदोलन केले.

यावेळी शिरूर शहरासह नागरिकांना मार्च महिन्यापासून वाढीव बिले आली असून कोरोना काळात नागरिक अडचणी आले असताना जादा वीज बिल कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक वीज वितरण कार्यालयात चकरा मारत आहे. परंतु अधिकारी जागेवर नाहीत. आधीच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले असताना, वीज वितरण कंपनी वाढीव बिले देऊन नागरिकांना अडचणीत आणत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी यांना भेटलो याबाबत माहिती दिली परंतु अधिकारी उडवाउडवची उत्तरे देत आहे. आज वीज वितरण कंपनीचे कार्यालया बाहेर अनेक नागरिक वीज बिले कमी करण्यासाठी आली होती परंतु अधिकारी नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे.

यामुळे अधिकारी यांचे कार्यालय संतप्त मनसे सैनकांनी फोडून खळ खट्याक आंदोलन केले. येथील टेबल, खुर्ची, काच याचे आंदोलनात नुकसान झाले आहे.आधीच कोरोनानी सामान्यांचे प्रचंड हाल होत असताना,आधीच लोकांना खाण्याचे हाल झाली आहे त्यात या वाढीव विजबीलाने लोकांचे कंबरडे मोडले आहे आज याच संदर्भात आम्ही विचारणा करण्यासाठी गेलो असता तिथे कुणीच अधिकारी उपस्थित नव्हते म्हणुन आम्ही आमच्या स्टाईल ने आंदोलन केले.असे जिल्हाध्यक्ष मनसे जनहित कक्ष चे सुशांत कुटे यांनी सांगितले