‘फास्टॅग’मुळे वाहनधारकांची ‘लूट’, टोल नाक्यावर मनसेचे आंदोलन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी (दि.15) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तामलवाडी टोल नाक्यावर जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घालून मनसे स्टाईल इशारा दिला. स्थानिक वाहनाकडून टोल वसूली करू नये, तसेच फास्टॅग सेवा बंद करण्यात यावी, अन्यथा खळकट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

फास्टॅग सेवेमुळे वाहनाधारकांची लुट केली जात आहे. सुरुवातीला टोल कर ३० रूपये प्रमाणे होता आत्ता फास्टॅगमुळे वाहनधारकांना ९० रूपये मोजावे लागत आहे. वाहन धारकांची लुट केली जात आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने माजी जिल्हा अध्यक्ष अमरराजे कदम, जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी टोल नाक्यावर आधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलनाचा इशार देण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंके, लोहारा तालुका अध्यक्ष अतुल जाधव, कळंब तालुका अध्यक्ष दत्ता घोगरे, तुळजापूर शहर अध्यक्ष धर्मराज सावंत, तालुका उपाध्यक्ष सलील औटी, कळंब शहर अध्यक्ष पवनराजे वर्पे, शिक्षक सेनेचे बबनजी वाघमारे सर, मनवीसे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम, सुरज कोठावळे, दयानंद कांबळे, विवेक बनसोडे, सौरभ लोखंडे, अक्षय साळवे, उमेश कांबळे, अमृत पोतदार, विशाल माने, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like