MNS Pune | मनसेला धक्क्यांवर धक्के ! वसंत मोरे यांच्या हकालपट्टीनंतर मनसे पुणे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Pune | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोंग्यांबाबतच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी चर्चा रंगली असतानाच पुण्यातील मनसे पक्षात (MNS Pune) मोठी घडामोड घडताना दिसत आहे. राज ठाकरे यांच्या आदेशाला विरोध केल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आले. यानंतर पुणे शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद (Azharuddin Bashir Sayyad) यांनी देखील मनसेला रामराम ठोकला आहे.

पुण्यात मनसे (MNS Pune) पदाधिकारी, कार्यकर्त्यात अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. आज (शुक्रवारी) मनसे शहर उपाध्यक्ष आझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. आतापर्यंत पुण्यातील मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मनसेला गळती लागली आहे. तर, मनसे शाखा अध्यक्ष माजीद शेख (Majid Sheikh), मनसेचे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी (Shahbaz Punjabi) यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्या जागी तात्काळ साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केलीय. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वसंत मोरे यांना फोन करून आपण शिवसेनेत (Shiv Sena) येण्याबाबत विचार करावा असं म्हंटल आहे. त्यामुळे पुण्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यावर अद्याप वसंत मोरे यांनी कोणतीही भूमिका घेतली नसून ते भविष्यात शिवसेनेत जाणार का ? अशा चर्चा देखील रंगताना दिसत आहेत.

Web Title : MNS Pune | mns pune city vice president azharuddin bashir syed resigns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर