2 दिवसात ‘मनसे’तून गद्दारांची हकालपट्टी होणार, राज ठाकरेंनी सांगितलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर होते. आपला तीन दिवसांचा दौरा पूर्ण करून ते आज मुंबईत परतणार आहेत. मनसे मेळाव्यात राज ठाकरेंनी आज पुन्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच मनसे पक्षातील काही पदाधिकारीच वाईट बातम्या पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या गद्दारांची नावे मला समजले असून अशा गद्दारांना दोन दिवसात पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, मी पक्षाच्या बैठकीसाठी आलो होतो. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्याला जोरात काम करायचे आहे. पण काही लोक चुकीच्या बातम्या देतात. आपलेच कार्यकर्ते गद्दार आहेत. त्यांची नावं मला समजली असून मी त्यांना पक्षातून हद्दपार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गद्दारपणा करणाऱ्यांना पक्षात जागा नाही त्यांची हकालपट्टी मी करणार असून दोन दिवसात त्यांना पक्षातून हकलून देणार असल्याचा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

मी पुन्हा येईन
बांगलादेशी घुसखोरांसाठी मी आंदोलन केलं. मात्र आता अफगाणी घुसखोर सापडले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. मी 15 दिवसांनी पुन्हा येईल त्यावेळी सविस्तर बोलेन असे राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मनसेबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या बाबात राज ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

You might also like