राज ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे नेते आणि मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवलेल्या आमदार अतुल भातखळकरांविषयी मनसे MNS अध्यक्ष राज ठाकरे गौप्यस्फोट केला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार भातखळकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिकीट मागण्यासाठी माझ्याकडे आले होते. पण मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका असे सांगितलं होतं, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

मनसे MNS प्रमुख राज ठाकरे एका वेबिनारच्या कार्यक्रमात बोलत होते. राजकीय नेत्याचं एक स्वप्न असते. त्यासाठी माणस लागतात. पण तुमच्याबरोबरची माणस सोडून जातात आणि आरोपही होतो, असा प्रश्न राज यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले. जे सोडून गेले, त्यांच्याबद्दल वाईटही वाटत. माण माझ्यासाठी आले, पण स्थानिक गोष्टींसाठी सोडून गेले. सुरूवातीच्या काळात माणस सोडून गेली नाहीत, असा एकतरी राजकीय पक्ष आहे का ? शिवसेना असो, भाजपा असो कुणीही असे राज म्हणाले. मी तुम्हाला 2009 मधील विधानसभा निवडणुकीतील गोष्ट सांगतो.

Coronavirus : ‘देशात सध्या व्हॅक्सीन ‘मिक्सिंग’ नाही, इतर देशांत रिसर्च जारी’ – नीती आयोग

भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे विधानसभेचे तिकिट मागण्यासाठी आले होते. भाजपाचेच एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे तिकीटासाठी आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला होता. त्या दोघांनाही मी सांगितलं की, असे करू नका. ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात, राग आला म्हणून असे करू नका. आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना अजून दोन माणसं तिथे होती. त्यांच्यासमोर सांगितलो आहे. साक्षीदार म्हणून त्यांना उभं करू शकतो. हे अस घडत असते. शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळातही अनेक लोक सोडून गेले. सोडून जातात तेंव्हा ते एकटे असतात, असे ठाकरे म्हणाले.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती