शिवसेना भाजपापुढे ‘लाचार’, मी असतो तर ‘हे’ झालं नसतं : राज ठाकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात असून आज पुण्यात झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. पुण्यात आणि नाशिकमध्ये शिवसेना कुठेच दिसत नाही असे सांगत शिवसेना भाजपसमोर लाचार झाल्याची घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली. भाजपसोबत शिवसेना युती झाली मात्र, नाशिक आणि पुणे यासारख्या शहरात भाजपने एकही जागा दिलेली नाही. यावरून राज ठाकरे यांनी टीका केली.

पुण्यातील कसबा येथे झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कल करत शिवसेनेवर शरसंधान केले. पुण्यात शिवसेना नावाचं काही दिसतच नाही. भाजपवाले रोज त्यांची इज्जत काढताहेत, असे सांगताना आमची इतकी वर्षे सडली पण आता यापुढे तसं होणार नाही. राज्यात आम्ही एकहाती भगवा फडकवू या उद्धव ठाकरेंच्या घोषणेचे काय झाले, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. नाशिक, पुण्यासारख्या शहरांमध्ये शिवसेनला भाजप एकही जागा सोडत नाही. काय करून ठेवलंय हे शिवसेनेचे. शिवसेना लाचार झाली आहे. बाळासाहेब असते तर हे करण्याची कुणाची हिम्मत झाली नसती. ते कशाला मी असतो तरही भाजपवाल्यांची हिम्मत झाली नसती, असे राज ठाकरे म्हणाले.

इतिहास शालेय पुस्तकांमध्ये सांगितला जात नाही. स्मारक तयार करण्याच्या घोषणा केल्या जातात. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला, पण अद्याप शिवस्मारक उभारता आले नाही. स्मारकाचे केवळ राजकारण केले जात आहे. स्मारक तयार करण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी खर्च करणे आवश्यक असल्याचे मत राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत व्यक्त केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like