शिवसेनेला ‘शह’ देण्यासाठी राज ठाकरेंची नवी ‘खेळी’, करणार ‘हा’ बदल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात बदलती राजकीय परिस्थिती ओळखून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलण्याची शक्यता आहे. मनसे पक्षाचा झेंडा बदलण्याच्या तयारीत आहे.

मनसे झेंड्याचा रंग भगवा किंवा केशरी करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. झेंड्याचा रंग बदलण्यावर विचारविनिमय झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याच्या मनसेच्या झेंड्याचा रंग निळा, भगवा आणि हिवा आहे. हा रंग बदलून आता संपूर्ण झेंडा भगवा करण्यात येणार असून त्यावर राजमुद्राही असेल अशी माहिती सूत्रांनी दिला आहे.

मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण येत्या 23 जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला होण्याची शक्यता आहे. या दिवशी मनसेचं महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहेत. याच दिवशी आता राज ठाकरे मराठा अस्मितेसोबत हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत. त्यासाठी झेंड्याचा रंग बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरे आता हिंदुत्वाची वोट बँक तयार करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/