‘या’ वादावरुन मनसे नेते संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतलं ‘ताब्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीचे अनधिकृत कंदील काढण्यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचा वॉर्ड ऑफिसरसोबत वाद झाला होता. याप्रकरणी जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तक्रार केली होती. याआधारे संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेऊन यांची चौकशी करण्यात आली.

जी उत्तर (दादर) भागात मनसेने दिवाळीनिमित्त कंदील आणि झेंडे लावले होते. हे झेंडे काढण्यात येत असताना संदीप देशपांडे यांचे सहाय्यक आयुक्तांशी वाद झाला होता, त्यात संदीप देशपांडे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्तांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी जी उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस स्थानकाला पत्र लिहून कळवले.

अधिकाऱ्याबरोबर वाद घातल्याने संदिप देशपांडे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळे आणणे, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करुन धमकावणे याअंतर्गंत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आला आहे.

हे आरोप संदीप देशपांडे यांनी फेटाळले आहेत, मी कोणत्याही अधिकाऱ्याला शिव्या दिल्या नाहीत. कामाचा जाब विचारला म्हणून 353 अंतर्गत गुन्हा दाखल करणार असाल तर आम्ही जामीनच घेणार नाही. शिवसेनेचे झेंडे काढले जात नाहीत. फक्त मनसेचेच झेंडे काढले जातात असा आरोप संदीप देशपांडे यांनी अधिकाऱ्यांवर केला.

Visit : policenama.com