MNS Sandeep Deshpande | मनसेचा शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार, सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी मुंबई महापालिका निवडणुका (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Election),  महापालिकेतील भ्रष्टाचार आणि सध्या सुरू असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Andheri East by-Election) पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सहानुभूतीच्या आधारे मत न मागता कामाच्या आधारे मागा, असा सल्ला मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी ठाकरेंना दिला आहे. संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) पत्रकारांशी बोलत होते. याबाबत देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना पत्रही लिहिले आहे.

संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या भेटीवर बोलण्यास देशपांडे यांनी नकार दिला. राज ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडतील का, या प्रश्नावर ते म्हणाले, सध्या महापालिका निवडणुका होत आहेत, त्यावर मी बोलेन. विधानसभा आल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर देईन.

दरम्यान, देशपांडे यांनी शिवसेनेला (Shivsena) अनेक सवाल पत्राच्या माध्यमातून विचारताना म्हटले आहे की, केवळ सहानुभूतीच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाऊ नका, कामांच्या आधारे पुढे या. मराठी माणसांनी तुम्हाला सहानुभूती का द्यायची? तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानभूती, तुम्ही मुख्यमंत्रीपद गमावले तुम्हाला सहानभूती, तुमचे चिन्ह गेले तुम्हाला सहानभूती, तुम्हाला आणखी कशाकशाची सहानभूती पाहिजे.

देशपांडे यांनी शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार करताना म्हटलेय की, आमचे अमित ठाकरे (Amit Thackeray) आजारी असताना शिवसेनेने मुंबईतील मनसेचे नगरसेवक चोरले, सहानुभूती कशासाठी? आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? 25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला?

कोरोना काळात लपून बसलात त्याची की पन्नास लाखाचे घड्याळ मिळाले त्याची?
महापौरांच्या मुलाला कोरोना काळात कंत्राट दिल त्याची सहानभूती पाहिजे की की लोकांचे कोरोना
मध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पब ना परवानगी दिलीत त्याची सहानभूती पाहिजे?
देशपांडे यांनी म्हटले आहे की, कोरोनामध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानभूती पाहिजे
की सामान्य माणसाला हॉस्पिटल्सनी बिलामध्ये लुटले त्याची सहानभूती पाहिजे?
रेल्वेमध्ये सामान्य माणसाला प्रवेश न देता आठ-आठ तास प्रवास करायला लावला त्याची सहानभूती पाहिजे?

कोरोनामध्ये लोकांना उपाशी राहायला लागले त्याची सहानभूती पाहिजे की शिवभोजन च्या नावाखाली भ्रष्टाचार झाला त्याची सहानभूती पाहिजे?
पत्राचाळीच्या घोटाळ्यात (Patrachal Land Scam)   शेकडो मराठी माणसे बेघर केलीत त्याची सहानभूती पाहिजे?
बार मालकाकडून शंभर कोटी वसूल केलेत त्याची सहानभूती पाहिजे की वाझेसारख्या अधिकार्‍याला परत आणलंत
त्याची सहानभूती पाहिजे?

संदीप देशपांडे यांनी पत्रात म्हटले आहे की, बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात त्याची सहानभूती
पाहिजे की त्याच्याच बाजूला असलेल्या महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झाली आहे त्याची सहानभूती पाहिजे?
अनधिकृत भोंग्यांविरुद्ध आंदोलन करण्यार्‍या महाराष्ट्र सैनिकांना तडीपार केलेत जेलमध्ये टाकलेत त्याची सहानभूती हवीय?

Web Title :- MNS Sandeep Deshpande | dont ask for opinions on sympathy ask on issues of works mns challenge to shivsena uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा