MNS Sandeep Deshpande | मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले – ‘त्यावेळची वसंतसेना आणि आताची शरदसेना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Sandeep Deshpande | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) आज (मंगळवारी) उत्तरसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या सभेत बोलत आहेत. याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार निशाणा साधला आहे.

 

त्यावेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “राज ठाकरेंनी त्या दिवशी मशीनप्रमाणे फायरिंग केली, यात अनेकजण घायाळ झाले. घायाळ झालेले लोक इतिहास माहित नाही अन् काहीही बोलू लागले. मनसे भाजपची (BJP) बी टीम म्हणाले. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही. शिवसेनेचा इतिहास तपासून घ्या. याच सेनेला वसंतसेना म्हटले जायचे. का ? तर वसंत दादा पाटलांनी मुंबई वेगळी करू असे म्हणत शिवसेनेला पुनर्जीवन दिले. त्यावेळची वसंतसेना आणि आताची शरद सेना झालीये.” असं ते म्हणाले.

 

पुढे संदीप देशपांडे म्हणाले, “डोळा एकाला मारला, प्रेम दुसऱ्याबरोबर, लग्न तिसऱ्याबरोबर आणि हनीमुन चौथ्याबरोबर, अशी अवस्था झालीये आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता.
राज साहेबांनी जी भूमिका घेतलीये, ती ठामच घेतलीये. त्यासाठी आम्ही कोणालाही घाबरत नाही.
आम्ही निवडणुकीपूर्वी युती एकाबरोबर आणि नंतर दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसलो नाही. अशा ढ लोकांनी भरलेल्या ढ सेनेने आम्हाला शिकवू नये.” अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.

 

Web Title :-  MNS Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande mns then vasant sena and now sharad sena sandeep deshpande slams shiv sena

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा