मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MNS Sandeep Deshpande | मागील तीस वर्षांपासून महाराष्ट्राचा तुकडा खाऊनही मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ठाकरेंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ”जे बाराखडी शिकणार नाहीत, त्यांचे बारा वाजणार,” असा थेट इशाराच देशपांडे यांनी दिला आहे.
या वेळी संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी शिकावीच लागेल. हिंदी भैय्यांनी आम्हाला शिकवू नये. मराठीचा अपमान करणाऱ्यांनी एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी किंवा आम्ही कारवाई करू, असाही इशारा देशपांडे यांनी दिला आहे.