मंत्र्यांवर वचक ठेवणार मनसेची ‘शॅडो कॅबिनेट’,काय आहे हा US – UK चा ‘फॉर्म्युला’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज महाअधिवेशन होत आहे. यावेळी मनसेने आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. अधिवेशनादरम्यान पक्षातील नेत्यांना अजेंडा देण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करणार असल्याची माहिती पक्षाचे नेते शिरीष सावंत यांनी दिली. या शॅ़डो कॅबिनेटमध्ये कोणकोणते नते असणार आहेत याची घोषणा माजी आमदार नितीन सरदेसाई दुपारी तीन वाजता करणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारमधील मंत्र्यांवर वचक ठेवण्याची जबाबदारी ही मनसेच्या नेत्यांवर असणार आहे. निवड झालेले नेते सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवणार आहे. तसेच कोठेही गैरव्यवहार होत असेल तर त्याची माहिती हे नेते पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत.

मनसेने स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि जयप्रकाश बाविस्कर या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या नेत्यांवर सरकारमधील मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. मंत्रीमंडळातील कोणत्याही मंत्र्याने कोणताही गैरव्यवहार केला तर त्याचा पाठपुरवा केला जाणार आहे. याचा संपूर्ण अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सोपवला जाणार आहे.

शॅ़डो कॅबिनेट म्हणजे काय ?
कॅबिनेट हे विधिमंडळ किंवा संसदेला प्रामुख्याने कनिष्ठ सभागृहाला जबाबदार असतात. असे असले तरी ते प्रामुख्याने जनलेला जबाबदार असतात. कॅबिनेट पद्धतीने विरोधी पक्षाला महत्व असते, कारण विरोधी पक्ष म्हणून तोच अधिकारावर येण्याची शक्यता असते. विरोधी पक्षाच्या या कॅबिनेटला शॅडो कॅबिनेट असे म्हटले जाते. या कॅबिनेटची सरकारमधील मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते.

फेसबुक पेज लाईक करा –