‘या’ पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटलांवर ‘जहरी’ टिका ; म्हणे, त्यांच्यामुळं ‘स्वार्थही’ ओशाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी फडणवीस सरकारने मंत्रीमंडळाचा विस्तार केला. मंत्रीमंडळात स्थान मिळवलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विखेंनी शपथ घेतल्यानंतर मनसे प्रवक्ता अनिल शिदोरे यांनी बोचरी टीका केली आहे. मुलाला पक्षात पाठवून स्वत:च्या पदरात मंत्रीपद पाडून घेणे यामुळे स्वार्थही ओशाळला असेल अशी टीका शिदोरे यांनी केली आहे.

 

लोकसभा निवडणुकीत नगरच्या जागेवर राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करून तिकीट मिळवले. भाजपाच्या तिकीटावर सुजय विखे विजयी झाले. यामुळे काँग्रेसच्याच नेत्यांकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळे विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजिनामा देऊन आदमदारकीचाही राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रीपद पदरात पाडून घेतले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करुन मंत्रीपद मिळवले. यावर मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी ट्विटरवर ट्विट करत विखेंवर बोचरी टीका केली आहे. शिदोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पावणेपाच वर्ष विरोधी पक्षनेतेपदावर राहून सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर राजकारण करणं, नंतर ऐन निवडणुकीच्या आधी मुलाला पक्षात पाठवून नंतर आपणच मंत्रीपद पदरात पाडून घेणं ह्यानं स्वत: स्वार्थही ओशाळला असेल, महाराष्ट्राबरोबर.’ अशी टीका केली आहे.

सिनेजगत

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

 

 

Loading...
You might also like