राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांना मनेसचा पाठींबा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे, भोसरीचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विलास लांडे आणि चिंचवडचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मनसेने बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे.

काळभोर नगर, चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे, भोसरीचे अपक्ष आणि पुरस्कृत उमेदवार विलास लांडे आणि चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मनसेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरातील तीनही मतदार संघात मनसेने उमेदवार दिलेले नाहीत त्यामुळे मनसेने महायुतीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. शहरात मनसेचा एकच नगरसेवक असला तरी पक्षाची मोठी ताकत आहे. मनसेच्या या भूमिकेसाठी राजकारणात रंगत आली आहे. मनसेचे पदाधिकारी थेट प्रचारात सहभागी होऊन काम करणार आहेत.

यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, राजू मिसाळ, प्रशांत शितोळे, प्रभाकर वाघेरे, निकिता कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like