MNS Uttar Sabha | ठाण्यात राजगर्जना ! राज ठाकरेंचं पुन्हा ‘लाव रे तो व्हिडिओ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Uttar Sabha | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ठाण्यात उत्तर सभा (MNS Uttar Sabha) होत आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी भाषणातून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधला आहे. गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याला चांगलाच विरोध दर्शविला होता. त्यानंतर राज ठाकरेंच्या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

 

राज ठाकरे यांनी आजच्या भाषणात बोललेले मुद्दे –

माझ्या ताफ्याला कोणीतरी अडवणार आहे. हे तपास यंत्रणांना कळाले पण एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरी जाणार हे त्यांना माहित नव्हतं.

देशात समान नागरी कायदा आणा. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा आणा असे नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे.
या गोष्टी देशात होणे आवश्यक आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे

भुजबळांना त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे आत जावं लागलं.
दोन अडीच वर्षे जेल मध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता. जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले.

ईडीची नोटिस आली म्हणून राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला असे म्हणातात. मी कधीही ट्रॅक बदलेला नाही.
मी ईडीच्या कार्यालयात गेलो.

मनसे हा विझलेला पक्ष असल्याचे जयंत पाटील म्हणतात.
मात्र, मला त्यांना सांगायचे आहे की, जंतराव मनसे हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी जयंत पाटलांचा उल्लेख ‘जंत’ पाटील असा केला आहे. (MNS Uttar Sabha)

सभेतील भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी त्यांच्या स्वत:च्या विधानांचे 3 व्हिडिओ खास अजित पवारांसाठी लावले.
यामध्ये त्यांनी मशिदींवरील भोग्या बाबत भूमिका मांडली होती.
यावेळी राज ठाकरे यांनी 28 जुलै 2018, 1 ऑगस्ट 2018, 23 जानेवारी 2020 मधील राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत त्यांची भूमिका मांडली होती.

अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड होते.
एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंना कंस जमलं ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सुप्रियांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात सुळे वेगळे.

पंतप्रधान मोदींवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो.
त्यानंतर बाकीचे बोलले असे राज यांनी सांगितले आहे.

मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही, तर हनुमान चालीसा लावणारच.

कानाला त्रास होत असेल तर भोंगे उतरवले पाहिजे.

3 मे पर्यंत भोंगे उतरवले तर कोणताही त्रास देणार नाही.

Web Title :- MNS Uttar Sabha | Thunder in Thane Raj Thackerays Laav Re To Video again

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा