MNS Vs BJP | आम्ही महायुतीचे घटक नाही; पदवीधर निवडणुकीवरून मनसे भाजपात जुंपली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MNS Vs BJP | लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) शेवटचा टप्पा सुरु आहे. १ जून ला सातव्या टप्प्यातील मतदान पार पडेल तसेच त्याबाबतची मतमोजणी ही ४ जून रोजी असणार आहे. या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला (Mahayuti) विनाशर्त पाठिंबा जाहीर केला होता. याबाबत महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर सभाही घेतल्या होत्या. दरम्यान आता या लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची (Padvidhar Matdar Sangh) तयारी सुरु झाल्याचे चित्र आहे.

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्यात आले आहे. अभिजित पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तसेच याठिकाणी भाजपाचे निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यामुळे याठिकाणी मनसे विरुद्ध भाजप असा सामना होणार का ? याबाबतची चर्चा सुरु आहेत.

मनसेने भाजपच्याच मतदारसंघात उमेदवार दिल्याने मनसे आणि भाजपात पुढील काही दिवसात सर्व आलबेल नसेल हेच चित्र दिसून येत आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे. मनसेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यांनतर भाजपच्या विरोधात उमेदवार दिल्याने युती तुटली का ? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता यावर अभिजीत पानसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पानसे म्हणाले, ” राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
ते म्हणाले होते, ‘ नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आम्ही महायुतीला विनाशर्त पाठिबा देत आहोत.
‘ देशाला सक्षम पंतप्रधान मिळावा यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता. तसेच त्यावेळी राज ठाकरे यांनी असेही सांगितले होते की,
येणारी प्रत्येक निवडणूक आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून लढणार आहोत. कारण आम्ही महायुतीतले घटकपक्ष
नाही आहोत. आम्ही त्यांना केवळ लोकसभा निवडणुकीत विनाशर्त पाठिंबा दिला होता.
त्यांच्या प्रचारासाठी आमचे महाराष्ट्र सैनिक लाखोंच्या संख्येने मैदानात उतरले होते. परंतु, आम्ही महायुतीचे घटक नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yogendra Yadav Analysis For Maharashtra | महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला लोकसभेच्या किती जागा मिळणार? योगेंद्र यादव यांनी सांगितले आकडे

Vadgaon Budruk Sinhagad Raod Pune Crime News | पुणे : चार वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण, आरोपीला अटक

Swapping Blood Sample In Sassoon Hospital | ‘उंदराला मांजर साक्ष’ ; ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणाऱ्या समितीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेलेच डॉक्टर