MNS Vs Sambhaji Brigade | प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवली थेट ‘कृष्णकुंज’वर; वाद चिघळणार?

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  MNS Vs Sambhaji Brigade | मागील काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांच्यात वाद उफाळला आहे. यावरून मनसे पदाधिकारी आणि संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यात आरोपप्रत्यारोप दिसून आले. मात्र सध्या संभाजी ब्रिगेडकडून आता मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांची पुस्तके पाठवली आहेत. ही पुस्तके राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पोस्टाने पाठवण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर मनसे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात आता वाद वाढण्याची शक्यता आहे. ‘बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमादरम्यान, राज ठाकरे यांनी ‘बाबासाहेबांनी अभ्यासपूर्ण इतिहास लिहिल्याचे म्हटले होते, राज यांच्या विधानावरून संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता.

राज ठाकरे यांच्या विधानावरून अनेक आरोपप्रत्यारोपाच्या झडी उठल्या गेल्या आहे.
मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी प्रवीण गायकवाड यांनी धमकी दिली होती.
2019 च्या निवडणुकीत पुण्यात फिरत असताना मी प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) अशी ओळख द्यावी लागत होती, तुम्हाला राज ठाकरे (Raj Thackeray) काय आहे हे कळणार सुद्धा नाही. त्यामुळे लायकीत राहायचे नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल होईल.
अशी धमकीच वसंत मोरेंनी दिली होती. यांनतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

आता, राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांनी लिहिलेली ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं’ ‘खरा ब्राम्हण’ आदी पुस्तकंच राज ठाकरे (Raj Thackeray)
यांच्या मुंबईतील निवास्थानी कृष्णकुंजवर (Krishnakunj) पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, ‘राज ठाकरे यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही.
तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.
राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात
पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याची जोरदार प्रविण गायकवाड यांनी केली होती.

 

Web Title : mns vs sambhaji brigade controversy erupts prabodhankar thackerays books sent on raj thackery house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | ‘दारू दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का? (व्हिडीओ)

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी 474 वर्षानंतर अद्भूत योग, गज केसरी योगमध्ये बांधली जाणार राखी

Udayanraje Bhosale | खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोना पॉझिटिव्ह?, 4 दिवसांपासून पुण्यात सुरु आहेत उपचार