MNS Vs Sambhaji Brigade | मनसे-संभाजी ब्रिगेड आमने-सामने, राज ठाकरेंना दिलं चर्चेच निमंत्रण

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  MNS Vs Sambhaji Brigade | महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं विकृतीकरण थांबवून सामाजिक, शैक्षणिक धार्मिक द्वेषवादाचं उच्चाटन करण्याचं काम पुरुषोत्तम खेडेकरांच्या विचारांच्या प्रबोधनातून झालं आहे. खेडेकर आणि त्यांच्या लिखाणाबद्दल बहुजन समाजामध्ये आदर आहे. मात्र राज ठाकरे काहीही माहीत नसताना चुकीचे वक्तव्य करत आहे. आपण प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारस असला तरी विचारांचे वारसदार होऊ शकला नाहीत. अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एवढेच नाही तर संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार असून राज ठाकरे यांनी चर्चेला यावं आम्ही खरा इतिहास समोर आणून दाखवू असे आव्हानही (MNS Vs Sambhaji Brigade) दिलं आहे.

मनोज आखरे म्हणाले, इतिहास माहित नसतानाही राज ठाकरे यांनी पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविषयही काहीही वक्तव्य केलं आहे.
हिंमत असेल तर तुम्हाला जे तुमचे खरे इतिहास अभ्यासक, संशोधक वाटतात त्यांना तुम्ही बोलवा आम्ही आमचे अभ्यासक आणि संशोधक बोलवून एक चर्चा सत्र घडवू.
यावेळी आम्ही तुम्हाला सत्य इतिहासाच दर्शन घडवू. आम्ही सत्य आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन इतिहास मांडू. वाटेल ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरू नये.
हिंमत असेल तर चर्चासत्र बोलवा असे आव्हान करत महाराष्ट्र हा पुरोगामी आहे.
फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा महाराष्ट्रात असून तिचं जतन करण्याचं काम
आजपर्यंत आम्ही केलं आहे असेही ते म्हणाले.

 

बाबासाहेब पुरंदरेंवरही केली टीका

मनोज आखरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवरही टीका केली आहे.
ते म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासामुळे दंगली घडल्या.
त्यांचा इतिहास राज ठाकरे वाचत आहेत. बाबासाहेबांच इतिहास लेखन हे दंगल पसरवणारं आहे.
राज्यात त्या माध्यमातूनच दंगली झाल्या होत्या.
परंतु, आपण जरी दंगली घडवत असला तरी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाच्या
विचारधारेमुळे या दंगली थांबलेल्या आहेत, असं आखरे म्हणाले.

 

Web Title : MNS Vs Sambhaji Brigade | sambhaji brigade chief manoj akhare say raj thackeray should come and discuss history with us we will show him real one

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये 30 रुपयांपेक्षा सुद्धा कमीमध्ये मिळेल 4 लाखाचा मोठा फायदा, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ

Supreme Court | पत्नीला घटस्फोट देऊ शकता, मुलांना नाही; 4 कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

Sunanda Pushkar Death Case | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता