मनसे करणार पुण्यातील पाण्याच्या शुद्धतेची चाचणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेची चाचणी मनसेतर्फे करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी दिली.

सदाशिव पेठ, कोथरुड परिसरातील नागरिकांनी आज मनसेच्या कार्यालयामध्ये येऊन नळाद्वारे येणारे पिण्याचे पाणी अशुद्ध येत असल्याच्या तक्रारी केल्या. सर्वसाधारणपणे शहराचा पाणीपुरवठा बंद असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी अशुद्ध पाणी पुरवठा होतो अशी तक्रार होती. पण एरवीही काहीवेळा पाणीपुरवठा अशुद्ध असतो. या तक्रारींची दखल घेऊन आता लवकरच आठही विधानसभा मतदारसंघातील पाण्याचे नमुने घेऊन त्याच्या शुद्धतेची परीक्षा करण्यात येणार आहे त्याबाबतचा आमचा निर्णय आज झाला आहे. तसेच शहरातील पाण्याचे साठे, स्त्रोत याविषयीचा नकाशा जिल्हाधिकाऱ्यांकडे असायला हवा. त्याचीही माहिती आता आम्ही घेणार आहोत. असे शिदोरे यांनी सांगितले.

विठ्ठल मंदिरात तिरंगा फुलांची आरास

पुण्याला पाणीपुरवठा अपुराच होत आहे. पण, जेवढा होतो तेवढा शुद्ध व्हावा असा आमच्या मोहीमेमागचा हेतू असल्याचे मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर यांनी सांगितले. पाण्याचे नमुने आम्ही अचानक घेणार आहोत असे पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.