मनसे कार्यकर्त्याला मारहाण प्रकऱणी ‘त्या’ भाजप नगरसेवकाला अटक

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी एक महिन्यापासून फरार असलेल्या कामोठे येथील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर याला कामोठे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

यापुर्वी पोलिसांनी याप्रकरणात मयुर चिपळेकर, तेजस म्हात्रे, किरण सोलकर यांना अटक केली होती.

निवडणूक संपताच पनवेलच्या कामोठे येथील भाजप नगरसेवक विजय ८ ते १० गुंडांना सोबत घेऊन मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांना खुर्च्या आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर कामोठे पोलिसांनी याप्रकरणी विजय चिपळेकरसह ९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली होती. २९ एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

दरम्यान पनवेल मनपा निवडणूकीत नगरसेवक चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडण्यात आले होते. त्यात मनसे कार्यकर्ता जाधव यांचा हात असल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं होतं.

Loading...
You might also like