‘महाराष्ट्राचे आरोपी’ टॅगलाईनने मनसेकडून मुख्यमंत्र्यांवर ‘गंभीर’ आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावून घेतले होते. ईडीनं राज ठाकरे यांची साडे आठ तास चौकशी केली. राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीचा सामना करावा लागल्याने मनसे सैनिक सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून इतर नेत्यांना टार्गेट केले आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे आरोपी या टॅगलाईनने सोशल मीडियावर पोस्टर्स पोस्ट केले आहेत. पोस्ट केलेल्या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्ते आक्रमक होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे कार्यकर्ते सरकारची गोची करणार असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे आरोपी या टॅगलाईनसह मनसेने कार्य़कर्त्यांवर हल्लाबोल केला आहे. प्रत्येक खात्याचा मंत्री, त्याचा फोटो आणि त्यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप अशा आशयाच्या पोस्ट मनसेकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –