मनसेला मोठा धक्का ! साताऱ्यात अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन  –   राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक राजकीय उलथापालथ झाल्या. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून सरकार सत्तेवर आहे. त्यानुसार मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे हे विराजमान आहेत. त्यानंतर शिवसेनेत इतर पक्षांची नेतेमंडळी, कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. आता साताऱ्यातही हीच परिस्थिती पाहिला मिळाली. मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन झाल्यानंतर पक्षात हजारो तरूणांनी प्रवेश केला. त्यावेळी पक्षाला मोठी उभारी मिळाली होती. कालांतराने मनसेचा प्रभाव कमी होत गेला. त्यानंतर पक्षातील नेतेमंडळी, कार्यकर्ते इतर पक्षात गेले. सध्या साताऱ्यातही मनसेला मोठा धक्का बसला आहे. कारण अनेक कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अनिल गुजर, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, सचिन जवळ, उप-तालुकाप्रमुख नंदू केसरकर, मोहन इंगळे, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

‘मनसे’चे माजी शहरप्रमुख प्रणव सावंत, अमोल गोसावी, स्वप्नील चव्हाण, गुरुप्रसाद साठे, राजेंद्र शेडगे, अक्षय गव्हाणे, अतुल पोपळकर, विशाल वाईकर, कार्तिक बारटक्के, आतिश कदम, अक्षय गव्हाणे, सतीश इंदलकर, ओमकार गोसावी, अतुल लोंढे, सिध्दार्थ गोसावी, अंकुश गिरीगोसावी, अवधूत देव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना संधी देणारा पक्ष

युवक संख्या आणि त्यांच्या सक्रियपणावर पक्षाचे भवितव्य ठरत असते. शिवसेना हा सर्वाधिक तरुणांना सामावून घेणारा, संधी देणारा पक्ष असून कार्यरत असणाऱ्या युवकांनी पक्ष मजबुतीसाठी सक्रिय होण्याचे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.