लोकलमध्ये सविनय कायदेभंग करणार्‍या मनसेच्या संदीप देशपांडेसह तिघांवर गुन्हा

पोलिसनामा ऑनलाईन – सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु व्हावी यासाठी मनसेने काल वेगवेगळ्या स्थानकांमध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केले. या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही सहकार्यांसह लोकलने कोणत्याही परवानगीविना प्रवास केला. त्यामुळे त्यांच्यावर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सुरु करण्यात आली, मात्र अजूनही लाखो प्रवासी रोज धक्के खात रस्ते मार्गाने प्रवास करत आहेत. राज्य सरकारने एसटी बसेस आणि इतर बसेस सुरु केल्या आहेत. त्यामध्ये प्रचंड गर्दी असते. मग लोकल का सुरु करत नाही, असा सरकारला सवाल करीत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला लोकल सुरु करण्यासाठी मुदत दिली होती. त्यामुळे त्यांनी काल सविनय कायदेभंग करुन लोकल प्रवास केला. त्यांच्यासोबत नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे आणि इतर दोघांनी शेळू ते नेरुळ असा लोकलने प्रवास केला. त्यानंतर या प्रवासाचे व्हिडीओदेखील प्रसारित केले आणि सरकारला परवानगीशिवाय लोकलमधून प्रवास करुन दाखवले. या त्यांच्या बेकायदेशीर प्रवासासाठी कर्जत लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like