६ ऑगस्ट पासून मनसेचे रिअॅलिटी ‘कान’ चेक आंदोलन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

1 ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहेत. सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. मल्टिप्लेक्समध्ये सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे आता मनसे तपासणार आहे. आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर मनसे 6 ऑगस्टपासून रिअॅलिटी ‘कान’ चेक आंदोलन करणार आहे. असे वृत्त समोर आले आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’963a9bca-9630-11e8-a8cd-b142e1d4f5b2′]

याबाबत अधिक माहिती अशी की, हायकोर्टाने वारंवार प्रश्न उपस्थित करुनही थिएटरमधील खाद्य पदार्थांच्या मनमानी किमती कमी होत नव्हत्या. शिवाय मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेने खळ्ळखट्याक आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी थिएटर कर्मचाऱ्यांना मारहाणही केली होती. त्यानंतर हा मुद्दा राज्यभर गाजला होता.

1 ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहेत. सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. मनसेचे कार्यकर्ते 6 तारखेपासून सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे तपासणार आहेत. अंमलबजावणी झाली नाही तर मनसे मल्टिप्लेक्सच्या स्टाफला कानाखाली लगावून रिअॅलिटी ‘कान’चेक आंदोलन करणार आहेत.
[amazon_link asins=’B006RHKER4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9fba185b-9630-11e8-8931-93eee64c3cea’]

दरम्यान, मल्टिप्लेक्सचालकांची मुजोरी अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. त्यासंदर्भात मनसेने पुन्हा परिपत्रक काढून मल्टिप्लेक्सचालक आणि सरकारला इशारा दिला आहे. सरकारचा आदेशही न जुमानणाऱ्या मल्टिप्लेक्सचालकांना कुणाचे अभय आहे, असा प्रश्न मनसेने विचारला आहे.