धक्कादायक ! महिलांना त्रास देणाऱ्या गुंडाला जमावाने ‘ठेचुन – ठेचुन’ मारलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्याकडे अनेक ठिकाणी गुंडांकडून महिलांना त्रास देण्याच्या घटना घडत असतात. त्यांवर पोलिसांकडून योग्य ती कारवाई होते तर अनेकदा महिलांकडून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. नागपूरमध्ये मात्र एक धक्कादायक घटना घडली असून एका गुंडाच्या कारवायांना वैतागून संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

या ३२ वर्षीय गुन्हेगाराने नाव आशिष देशपांडे असे असून वस्तीतील नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, अंमली पदार्थांचा नशा करून महिलांना त्रास देणे असे त्याचे प्रकार तो करत असे. तो बऱ्याचदा शांतीनगरमधील नालंदा चौक वस्तीतून अरुंद गल्ल्यांतून वाईट पद्धतीने वाहन चालवात महिलांची छेड काढत असे. यावरूनपण महिला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा वाद होत असत. काल (सोमवारी) रात्री त्याने पुन्हा असे वाहन चालवल्यामुळे येथील वस्तीतील महिला आणि गुंड आशिषमध्ये मोठा वाद झाला. यावेळी पोलीस आल्यानंतर त्याने तेथून पोबारा केला.

काही वेळानंतर पोलीस गेल्यानंतर तो पुन्हा वस्तीत येऊन चाकू हातात घेऊन महिलांना धमक्या देऊ लागला. यावेळी त्याच्या या नेहमीच्या त्रासाने कंटाळलेल्या संतप्त जमावाने त्याला हातात मिळेल त्या साहित्याने मारहाण केली. यावेळी त्याच्यावर फारशी, विटा, मारल्या गेल्या. अखेरीस जमावाद्वारे मारलेल्या लोखंडी रॉडचा वार जिव्हारी लागून त्याचा मृत्यू झाला.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like