मॉब लिंचिंग प्रकरण : ४९ दिग्गजांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात सुरु असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यात याव्या यासाठी दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन आणि अनुराग कश्यप यांच्यासह ४९ व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या ४९ व्यक्तींमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा, लेखकांचा समावेश आहे. धर्माच्या नावावर हिंसाचार होत असल्याचे मत या पत्रात व्यक्त करण्यात आले.

पत्रात लिहिले आहे की, दुर्देवाची गोष्ट आहे की, जय श्रीराम घोषणा देऊन हिंसाचार केला जात आहे. भारताच्या बहुसंख्य लोकांमध्ये रामाचे नाव आदराने घेतले जाते. एक जानेवारी २००९ ते २९ ऑक्टोबर २०१८ पर्यंत धर्माच्या नावावर २५४ हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. २०१६ वर्षात दलितांवर झालेल्या अत्याचाराचे ८४० घटना समोर आल्या आहेत. भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे. येथे प्रत्येक धर्म, समूह, लिंग, जातीच्या लोकांना समान अधिकार आहेत. मुस्लीम, दलित आणि इतर अल्पसंख्यांकावर होणारे जमावांचे हल्ले थांबले पाहिजे, असं या पत्रात म्हटलं आहे.

सरकारवर टीका म्हणजे देशावर टीका नाही

जर कोणी विरोधात मत व्यक्त करत असेल तर त्याला देशविरोधी किंवा अर्बन नक्षल ठरविणे चुकीचे आहे. देशात सत्ताधारी पक्षावर टीका करणे म्हणजे देशावर टीका करणे नाही. कोणताही पक्ष सत्तेत येतो तेव्हा देशाचं प्रतिक बनत नाही. त्यामुळे या देशात सरकारविरोधात बोलणे म्हणजे देशविरोधी बोलणे असा अर्थ काढणे चुकीचे आहे असे त्या पत्रात म्हटले आहे.

प्रिय प्रधानमंत्रीजी, या गुन्हेगारांविरोधात काय कारवाई केली आहे ? हा प्रश्न देखील या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला आहे. पत्र लिहिणाऱ्या ४९ व्यक्तींमध्ये दिदर्शक अनुराग कश्यप, इतिहासकार रामचंद्र गुहा, अदूर गोपालकृष्णन, मणिरत्नम, बिनायक सेन, सौमित्रो चटर्जी, अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा, रेवती, श्याम बेनेगल, शुभा मुद्गल, रूपम इस्लाम, अनुपम रॉय, परमब्रता, रिद्धि सेन यांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –