मॉब लिंचिंग : जमावाकडून पोलिस कर्मचाऱ्याचा ‘बेदम’ मारहाण करून खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनेक राज्यांत आपण मॉब लिंचिंगच्या घटना घडताना पाहत असतो. अशाच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यामध्ये एका पोलीस  हेड कॉन्स्टेबलची जमावाने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली. येथील जमिनीच्या प्रकरणाचा तपास करून परत जाणाऱ्या या हवालदाराची काही गुन्हेगारांनी मारहाण करून हत्या केली.

४८ होते वय

राजसमंद जिल्ह्यातील रातिया थाक गावात हि घटना घडली असून मृत हेड कॉन्स्टेबलचे नाव अब्दुल गनी होते. तो ४८ वर्षांचा होता. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या या हेड कॉन्स्टेबलला तेथील नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी दवाखाण्यात दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक राजेंद्र सिंह आणि सीआय लाभूराम विश्नोई यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.

लाठ्या काठ्यांनी केला हल्ला

या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले कि, ते आपले काम करून गाडीवर परत येत असताना चार ते पाच अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्याचबरोबर या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

आरोग्यविषयक वृत्त