मोबाईल आणि TV च्या सवयीमुळं मुलांच्या मेंदूरवर गंभीर ‘परिणाम’, ‘एम्स’च्या प्रोफेसरांनी बचावासाठी दिला ‘सल्ला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाइल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी मोबाईलवर जास्त वेळ गेम खेळणे आणि टीव्ही पाहण्याच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवले पाहिजे. सोमवारी एम्स येथे झालेल्या कार्यशाळेत 9 शाळांमधील सुमारे 500 विद्यार्थ्यांना या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. इंडिया अ‍ॅकॅडमी ऑफ न्यूरो सायन्सच्या वार्षिक चर्चेत एम्सचे फिजियोलॉजी विभागाचे प्राध्यापक के.के. दीपक म्हणाले की , ‘फिजिओलॉजी अँड मेडिसिन’ या विषयाकडे विद्यार्थी आणि पालक दुर्लक्ष करून कॉर्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, पेडियाट्रिकसारखे कोर्सलाच अ‍ॅडमिशन घेतात . हे एक गंभीर संकट आहे. पालकांना माझा सल्ला आहे की मुलांना त्यांच्या आवडीनुसार कोर्सला अ‍ॅडमिशन घेण्याची परवानगी द्यावी .

काही काळापूर्वी अभियांत्रिकी व एमबीए कोर्सचा ट्रेंड होता पण हळूहळू तो कमी झाला. हृदयविकाराचा झटका, न्यूरो, कॅन्सर आणि अधिक गंभीर आजार 5 टक्के लोकांमध्ये आढळतात. अशा परिस्थितीत उर्वरित 95 टक्के आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता आहे. यामुळेच देशात नवीन औषधांचा शोध लावला जात नाही.तणावग्रस्त जीवनशैलीमुळे लोक व्यवस्थित झोपू शकत नाहीत. लोकांना हप्त्यांमध्ये आठ तासांची झोप पूर्ण करायची आहे. हे चुकीचे आहे.

कारण शरीर आणि मेंदू ताजे ठेवण्यासाठी रात्री सलग 8 तास झोपेची आवश्यकता असते. यामुळे, लोक बहुतेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अयशस्वी होतात कारण तणावामुळे ते कमी झोपतात आणि यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.’एम्स फिजिओलॉजी विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. सिमरन कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार ,’ मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे मुलांमध्ये तणाव देखील वाढतो आणि ती हट्टी बनतात. यावर मात करण्यासाठी, पालकांना सल्ला दिला जातो की मुलाला संतुलित आहार द्या आणि आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे मुलांचे आरोग्य सुधारेल.’

Visit : Policenama.com