WhatsApp नं लॉन्च केलं ‘भन्नाट’ फीचर, तात्काळ निदर्शनास येतील ‘फेक न्यूज’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बनावट बातम्यांबाबत आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअप सतत काम करत आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअपने प्रथम फॉरवर्डिंग मर्यादित केले, त्यानंतर लेबल करण्यास म्हणजे जर एखादा मॅसेज वारंवार फॉरवर्ड केला जात असेल तर त्यावर एक निशाणी येते.

व्हॉट्सअपने आता फेक न्यूज रोखण्यासाठी एक नवे टूल सादर केले आहे, ज्याचे नाव सर्च टूल आहे. या फिचरसाठी व्हॉट्सअपने गुगलशी भागीदारी केली आहे. व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरची माहिती कंपनीने आपल्या ब्लॉगवर दिली आहे.

आता प्रश्न हा आहे की, हे फिचर काम कसे करणार. जर तुमच्याकडे लिंकसह एखादी बातमी आली तर त्या लिंकच्या उजव्या बाजूलाच एक सर्च आयकॉनचे बटन दिसेल ज्यावर क्लिक करताच गुगल उघडेल आणि त्या बातमीद्वारे संबंधित अनेक लिंक्स मिळतील.

अशातच तुम्हाला केवळ एका क्लिकवर समजले की ती बातमी खोटी आहे की, नाही. जर व्हॉट्सअपच्या टीमने ती बातमी अगोदरच फॅक्ट चेक केली असेल तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मिळेल.

व्हॉट्सअपचे हे फिचर ब्राझील, इटली, आयरर्लंड, मेक्सिको, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेत लाइव्ह झाले आहे. भारतात याच्या लाँचिंगची सध्या तरी घोषणा झालेली नाही. हे फिचर अँड्रॉईड, आयओएस आणि वेब तिन्ही व्हर्जनवर काम करेल.