5 वर्षांपुर्वी घेतला होता मोबाईलचा बॅकअप, Lockdown मध्ये केलं मित्राच्या पत्नीला ‘ब्लॅकमेल’

जोधपूर : वृत्तसंस्था – काेरोनामुळे लॉकडाउनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. काम मिळत नसल्यामुळे अनेकांनी गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत . अशीच एक घटना राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातून आली आहे. तरुणाने एका महिलेला मोबाईलवर फोन करणे, व्हॉट्सअ‍ॅपवर तिचे अश्लील फोटो पाठवत ते व्हायरल करण्याची धमकी देत साडेतीन लाख रुपये मागितल्याचा प्रकार समोर आला आहे . या संबंधित महिलेने याप्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे .
बनाड ठाण्याचे प्रभारी अशोक आंजना यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून एका अज्ञात नंबरवरून या महिलेला फोन येत होते. त्याच नंबरवरून तिचे आक्षेपार्ह फोटो पाठविले जात होते. तसेच हे खासगी फोटो व्हायरल करण्याच्या नावावर ब्लॅकमेल करत होता. तसेच तिच्याकडे या बदल्यात पैशांची मागणी केली होती.

पोलिसांनी यानंतर लगेचच एफआयआर दाखल करून घेत आरोपीला अटक केली आहे. चौकशीवेळी आरोपीने जे सांगितले ते धक्कादायक होते. तो आरोपी महिलेच्या पतीचा मित्र होता. पाच वर्षांपूर्वी हे दोघेही एकत्र काम करत होते. त्यावेळी त्या महिलेच्या पतीच्या मोबाईलचा बॅकअप लॅपटॉपमध्ये घेतला होता. मात्र, लॉकडाउननंतर आर्थिक अडचण जाणवू लागल्याने महिलेला तिच्या पतीसोबतचे अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल करू लागल्याचे आंजना यांनी सांगितले.