हे काय… खिशातच झाला मोबाईलचा स्फोट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन

मोबाईलचा अचानक खिशात स्फोट झाल्याची घटना मुंबईल एका हाॅटेल मध्ये आज (मंगळवार) घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी, हाॅटेल मध्ये बसलेल्या इतर नागरिकांची मात्र तारांबळ उडाली होती.

मुंबईतील भांडुप स्टेशनजवळ ‘बगिचा हाॅटेल’ मध्ये संबंधित व्यक्ती जेवत होता. दरम्यान शर्टच्या खिशात त्याने आपला मोबाईल ठेवला असता, अचानक खिशातील मोबाईलचा स्फोट झाला. नंतर लगेच त्या व्यक्तीने मोबाईल फेकला मात्र, तोपर्यंत त्या व्यक्तीचे कपडे जळाले होते. हि घटना सीसीटीव्ही काॅमेऱ्यामध्ये कैद झाली असुन, तेव्हा मोबाईल वापरताना काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेवरुन आपणास बघायला मिळेल.