खुशखबर ! मोबाईल डेटानं TV पाहता येणार, गुगलनं आणलं ‘भन्‍नाट’ फिचर, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – गुगलने भारतात Android TV साठी एक खास फीचर रोलआऊट केले आहे. वाय-फाय कनेक्शन नसणाऱ्या परंतू मोबाईल डेटा आणि हॉटस्पॉटच्या सहाय्याने टीव्ही पाहणाऱ्या युजर्ससाठी गुगलचे हे नवीन फीचर असणार आहे. त्यामुळे मोबाईल डेटाच्या माध्यमातून युजर्सना लवकरच टीव्ही पाहता येणार आहे.

गुगलने या खास Android Tv फिचरबरोबरच एक कास्ट फीचर लॉन्च केले आहे, ज्या माध्यमातून यूजर्स आपल्या मीडिया फाईल्समधील फोटो देखील टीव्हीवर पाहू शकतील.

गुगलच्या जोरिस वान मेंस यांनी लिहिलेल्या एका ब्लॉग पोस्टमधून ही माहिती दिली. त्यानुसार यूजर्सला डेटा सेव्हर, हॉटस्पॉट गाईड आणि डेटा अलर्ट असे फिचर देण्यात येणार आहेत. लिमिटेड मोबाइल डेटाचा वापर करुन टीव्ही पाहणाऱ्या यूजर्ससाठी हे फिचर मोठे उपयुक्त ठरणार आहे.

डेटा सेव्हरच्या माध्यमातून वॉच टाइम जवळपास 3 पटीने वाढेल आणि मोबाइल डेटाचा कमी वापर होईल असा दावा गुगलने केला आहे. याशिवाय यूजर्सला याची देखील माहिती मिळेल की आतापर्यंत डेटा किती वापरला गेला आहे. हॉटस्पॉट गाईड, यूजरला मोबाइल हॉटस्पॉटसह टीव्ही सेटअप करण्यास मदत करेल.
या फिचरचा फायदा या यूजरला होणार आहे जे हॉटस्पॉटच्या माध्यमातून स्मार्ट टीव्हीवर इंटरनेट वापरुन मनोरंजनाचा आनंद घेतात, या फिचरमुळे यूजरचा आनंद निश्चितच दुप्पटीने वाढेल.