मोबाईल फोन खरेदी करताय मग थोडं थांबाच, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरींगवर लवकरच मोठी सवलत मिळण्याची शक्यता आहे. एका एक्सक्लुझिव रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. सरकार त्या वस्तूंच्या मॅन्युफॅक्चरींगला प्रोत्साहन देण्यासाठी खास स्कीम आणू शकते. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टच्या प्रॉडक्शनवर इन्सेंटीव्ह दिला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टच्या प्रॉडक्शनसाठी 5 ते 7 टक्के इन्सेंटीव्ह देण्याची शक्यता आहे. प्रॉडक्शनसाठी हा इन्सेंटीव्ह 5 ते 7 वर्षांसाठी असण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटर मिनिस्ट्रियल ग्रुपकडून नव्या स्कीमची शिफारस करण्यात आली आहे ज्यात रोजगार, गुंतवणूक, क्षमता विस्तारावर आधारीत हा इन्सेंटीव्ह दिला जाण्याचा प्रस्ताव आहे. यात इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट प्रॉडक्शन आणि इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट वाढवण्यावर फोकस आहे. या स्कीमवर उद्योग आणि अर्थ मंत्रालयामध्ये चर्चा झाल्याचंही समजत आहे. लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवला जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/