Pimpri : Online शिक्षणासाठी मोबाईल देणे पालकांना पडले महागात, 11 वर्षांच्या मुलीने बनवला अश्लील Video

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाचा पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. मात्र एका पालकांना आपल्या मुलीला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल हाती देणे चांगलेच महागात पडले आहे. पिंपरी- चिंचवडमधील एका 11 वर्षाच्या मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी मोबाईल घेऊन दिला. मात्र मुलीने अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मिडियावर मित्राला पाठवल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवशी वडिलांनी सहज मोबाईल पाहिला असता तिच्या मोबाईलवर तिचाच अश्लील व्हिडीओ दिसला. याबाबत मुलीला विचारले असता सोशल मिडियावरील मित्राने व्हिडीओ पाठविण्यासाठी धमकी दिल्याचे सांगितले. तसेच व्हिडीओ न पाठविल्यास घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सायबर सेलकडे धाव घेतली. पोलिसांनी मुलीच्या मोबाईलची तपासणी केली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिशाभूल केल्याचे दिसून आले. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संजय तुंगार म्हणाले, संबंधित मुलीने अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठविला आहे. तसेच सोशल मिडियावर अश्लील संभाषण केल्याचे आढळले आहे. सोशल मिडियावरील मित्राला काही पैसे दिल्याचे सांगितले असून त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे ते म्हणाले.