पुण्यात हरवलेला मोबाईल सापडला कर्नाटकात

पुणे:पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील शुक्रवार पेठेत राहणाऱ्या कमलेश जगताप यांचा ३० हजार रुपयांचा मोबाईल सप्टेंबर २०१८ मध्ये गोकुळआष्टमीच्या दिवशी गर्दीत हरवला होता. जगताप यांनी याची तक्रार पुणे पोलिसांच्या बेवसाईटवर ऑनलाईन केली.पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन जगताप यांचा मोबाईल कर्नाटक येथून शोधून त्यांना आज परत केला.
गोकुळ आष्टमीच्या दिवशी जगताप यांचा ३० हजार रुपये किंमतीचा MI कंपनीचा मोबाईल गर्दीत हरवला होता.या मोबाईलमध्ये त्यांचा महत्वाचा डाटा होता. त्यांनी याची तक्रार पुणे पोलिसांच्या बेवसाईटवर ऑनलाईन केली.पोलीस शिपाई एम.एम.दावणे यांनी तांत्रीक पदधतीने केला. त्यावेळी हा मोबाईल कर्नाटकातील आंकुश बिदर या व्यक्तीकडे असल्याचे निष्पन्न झाले.दावणे यांनी बिदर यांचा मोबाईलनंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. मोबाईल हरवलेला मोबाईल तुमच्याकडे असून तो खडक पोलिसांना पाठवण्याची विनंती केली. अंकुश बिदर यांनी मोबाईल कुरीयरने खडक पोलिसांना पाठवून दिला.
पुणे पोलिसांनी जगताप याच्याशी संपर्क साधून मोबाईल मिळाल्याची कल्पना दिली. जगताप यांना उद्या खडक पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा हरवलेला मोबाईल परत केला जाणार असल्याचे पोलीसंनी सांगितले. खडक पोलिसांनी हरवलेला मोबाईल मिळवून दिल्याने जगताप यांनी खडक पोलिसांचे अभार मानले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम मीसाळ, एम.एम. दिवाण यांनी केली.