‘त्या’बाबत परेशात होत असाल तर ‘असा’ करा नंबर ‘पोर्ट’, खुपच सोप MNP

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सिम कार्ड कंपन्या अनेक नवीन नवीन ऑफर्स देतात आणि आपल्याला सिम घ्यायला भाग पाडतात. मात्र यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काहींचा नेटवर्क प्रॉब्लेम तर काहींचा इंटरनेट प्रॉब्लेम असतो. अशात प्रत्येकवेळी फोन नंबर बदलणे योग्य होत नाही. म्हणून आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपला क्रमांक पोर्ट करू शकता.

या पद्धतीने करा आपला नंबर पोर्ट

1. सगळ्यात आधी आपल्या मोबाइल नंबर वरून एक मेसेज पाठवा

2. मेसेजमध्ये PORT लिहून स्पेस द्या आणि आपला दहा आकडी नंबर लिहा. समजा तुमचा मोबाइल नंबर 1234567890 हा आहे तर उदा – PORT 1234567890 असे लिहावे लागेल.

3. हा मेसेज 1900 या नंबरवर पाठवा

4. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये एक कोड असेल.

5. हा कोड घेऊन आपल्या कंपनीच्या स्टोअरमधे जा.

6. यानंतर तुमचा मेसेज तपासून आणि ओळख पत्र घेऊन तुम्हाला नवीन सिमकार्ड देण्यात येईल.

7. हे सिम मिळवल्यानंतर हे कधीपर्यंत सुरु होईल याची माहिती तुम्हाला स्टोअरवालाचं देऊ शकेल.

Visit : Policenama.com