आता मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी होणार आणखी सोपी

नवी दिल्ली : 

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) आता आणखी सोपी होणार आहे. यासाठी नवीन नियमावली बनवण्यात आली आहेत . टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) लवकरच पोर्टेबिलिटीसाठी लागणारा वेळ ७ दिवसांवरुन २ दिवस करण्याच्या तयारीत आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सहज होण्यासाठी ट्रायकडून एप्रिलमध्ये मसुदा तयार करण्यात आला होता. यात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी बाबत नवी नियमावली तयार करण्यात आली होती.

नवे नियम लागू झाल्यानंतर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी करण्यासाठी ग्राहकांना ७ दिवस थांबावे लागणार नाही. ग्राहकांना २ दिवसांत आपला मोबाईल ऑपरेटर बदलता येणार आहे. भारतात जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पोर्टेबिलिटीसाठी १५ दिवस लागतात.

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी

२० जानेवरी २०११ पासून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी या सुविधेची सुरुवात झाली आहे. या सुविधेमुळे ग्राहकाला आपला नंबर न बदलता ऑपरेटर बदलता येतो. यासाठी ग्राहकांना १९०० या नंबरवर PORT Mobile Number असा मेसेज करावा लागतो. त्यानंतर युनिक पोर्टिंग कोड (युपीसी) चा मेसेज येतो.

मोबाईलवर आलेला युपीसी कोड आणि ओळखपत्र जवळच्या रिटेलरजवळ जाऊन पोर्टेबिलिटी करता येते. यासाठी सध्या ७ दिवस लागतात. तसेच यापूर्वी ट्रायने या सेवेसाठी असलेले १९ रुपयांचे शुल्क ४ रुपये केले आहे.

२०१७मध्ये रिलायन्स जियोची टेलीकॉम क्षेत्रात एन्ट्री झाल्यानंतर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी करण्यात येणा-या अर्जामध्ये चारपट वाढ झाली आहे.

जाहिरात

…तर  कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही; सरन्यायाधिशांनी दिला इशारा

जाहिरात

[amazon_link asins=’B00DRLASZ6,B009WNA9V6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e84a9a4-b354-11e8-938f-8dd9cadfe5ba’]