मोबाईल, लॅपटॉपमुळे ’या’ 8 आरोग्य समस्यांचा धोका, अशी 8 प्रकारे घ्या काळजी, वेळीच व्हा सावध

पोलिसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना काळात मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर वाढला आहे. मुलांनी सध्या मोबाईलवर तासनतास गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा गंभीर परिणाम शरीराच्या विविध अवयवांवर होत आहे. यामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहे. डोळ्यांना धुसर दिसणं, डोळयातून पाणी येणं, डोकेदुखी, चष्मा लागणं अशा समस्या होत आहेत.

होतात या समस्या

1 ब्लू लाइटमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात.

2 त्वचेवर रिंकल्स, हायपरपिग्मेंटनेशन अशा इतर त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात.

3 डोळ्यांचे आजार वाढू शकतात.

4 लठ्ठपणाची समस्या वाढू शकते.

5 रक्तदाब वाढू शकतो.

6 डोळ्यांची जळजळ

7 मोतीबिंदू, काचबिंदूसारखे आजार होत आहेत.

8 डोक्याजवळ मोबाइल ठेवल्याने निद्रानाश दिसून येत आहे.

अशी घ्या काळजी
1 फोन, लॅपटॉप चेहर्‍याच्या अगदी जवळ धरू नका. काही अंतरावर मोबाईलचा वापर करा.
2 मोबाईलचा वापर करताना रात्री नाईट मोडवर ठेवा.
3 रात्री झोपण्याच्या 1 ते दिड तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळा.
4 काही सनस्क्रिन लाइटपासून त्वचेचे होणारे नुकसान कमी करतात. अशा क्रिम्सचा वापरा.
5 संतुलित आहार घ्या.
6 रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय बंद करा.
7 लवकर झोपा.
8 अँटिऑक्सिडंटयुक्त तसेच व्हिटामीन्स, प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.