‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’ करण्याची एअरटेल कंपनीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल ने आपल्या सेवांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याचा एयरटेलची ३ जी सेवा वापरणाऱ्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. कारण ४ जी सेवा वाढवल्यानंतर अखेर एअरटेलने त्यांची ३ जी सेवा बंद करण्याची तयारी सुरु केली आहे. नुकतंच कंपनीने कोलकत्यामध्ये ३ जी नेटवर्क बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. ३ जी सेवा बंद करणारी एअरटेल ही भारतातील पहिलीच टेलिकॉम कंपनी आहे.

३ जी सेवा करणार बंद –

३जी सेवा बंद केल्यानंतर कंपनी आता ४जी सेवेवर लक्ष केंद्रीत करत आहे. कोलकत्यात ३जी सेवा बंद केल्यानंतर आता ग्राहकांना हायस्पीड ४जी ब्रॉडबँड मिळणार आहे. एअरटेल ४जीची सेवा वाढवण्यासाठी कंपनीने स्टेट ऑफ द आर्ट एल ९०० टेक्नॉलॉजीला ९०० एमएचझेड बँडचा वापर सुरु केला आहे.

२ जी सेवा राहणार सुरु –

भारती एअरटेलच्या एका आधिकाऱ्यांने याबाबत महिती देताना सांगितले की, आम्ही भारतात आमच्या सर्व ३ जी स्पेक्ट्रम रिफ्रेम करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ४जी सेवा शहरात अंमलात आणली जाणार आहे. कंपनीने कोलकत्यात आपली ३जी सेवा बंद केली असली तरी कंपनीने  २जी सेवा मात्र सुरु ठेवली आहे. फिचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांचा विचार करता कंपनीने २जी सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने ग्राहकांना आपल्या मोबाईलमधील सीमकार्ड अपडेट करण्याची सूचना ग्राहकांना केली होती. आता ग्राहकांना ४जी चा फायदा घेता येणार आहे. काही वर्षांआधी ग्राहकांकडून  ३जी हँडसेटचा वापर अधिक होत होता. परंतू आता  ४जी स्मार्ट फोनचा वापर वाढल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एअरटेलच्या ३जी सेवा घेणाऱ्या ग्राहकांना अपडेट व्हावे लागणार आहे.

‘या’ डायरेक्टरला पहायचाय अभिनेता आयुष्मान खुराणाचा ‘प्रायव्हेट पार्ट’

‘या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये ‘एन्ट्री’ करणार ‘चिक्कू’ ऋषी कपूर !

मॉबलिंचिंग विरोधात मुस्लिम समाजाचा दौंडमध्ये मोर्चा, दलित समाजाकडून मोर्चाला पाठिंबा

आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख अन नोकरी कधी ?

रोज एक कप ‘कॉफी’ प्या आणि ‘मधुमेह’ कंट्रोलमध्ये आणा

चिंचेचा ‘हा’ फेसपॅक वापरा आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा