अरे व्वा भारीच ! BSNLचा स्वस्त प्लान, 25 पैशात दररोज अनलिमिटेड कॉलिंग अन् 100 SMS, जाणून घ्या

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – हल्ली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यामध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. ग्राहकांसाठी निरनिराळे प्लॅन्स बाजारात आणले जात आहेत. अशातच देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान आणला आहे. याचा डेटा खर्च खूपच कमी आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची वैधता मोठी अन् अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

यात कंपनीने 699 रुपयांचा एक जबरदस्त प्लान ऑफर केला आहे. या प्लानमध्ये कंपनी युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देते. प्लानची वैधता 180 दिवसाची असून सोबत 180 दिवसांसाठी 500 MB डेटा दिला जात आहे. याचाच अर्थ या प्लानसोबत 90GB डेटा मिळतो. याशिवाय एकदा FUP डेटा संपल्यानंतर, इंटरनेटची स्पीड 80 Kbps होते. युजर्संना या प्लान सोबत 60 दिवसांसाठी फ्री कॉलर ट्यूनची सुविधा दिली जाते.

जर तुमच्याकडे अन्य कंपनीचे सिम कार्ड असेल ज्याचा वापर तुम्ही डेटासाठी करीत असाल तर बीएसएनएलचा 699 रुपयांचा प्रीपेड प्लान तुमच्यासाठी सेकंडरी सिमसाठी चांगला प्लान आहे. BSNL च्या 699 रुपयांच्या प्लानला रिचार्ज, पेमेंट पोर्टलवर जाऊन खरेदी करता येते. तसेच तुम्हाला अतिरिक्त डेटाची गरज असल्यास त्याला एक डेटा व्हाउचर खरेदी करता येते. 16 रुपयांपासून सुरू होतो. यात 1 दिवसांसाठी 2 जीबी डेटा कंपनीने दिला आहे.