BSNL चा युजर्संना दणका, ‘या’ रिचार्जमधील अनलिमिटेड कॉलिंग आता बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संचार लिमिटेडच्या STV ३९५ पॅक बाबत एक माहिती समोर आली आहे. BSNL च्या या पॅकसोबत यापुढे व्हाइस कॉलिंग लिमिट पुन्हा लागू होणार आहे. टेलिकॉम कंपनी ३१ ऑक्टोबर पर्यंत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग बेनिफिट लागू करत होती. ७१ दिवसांची वैधता असलेल्या पॅक सोबत ग्राहकांना रोज २ जीबी डेटा प्राप्त होतो. नव्या बदलानंतर या सुविधा ग्राहकांना मिळत राहतील.

BSNL STV ३९५ च्या या पॅकमध्ये नवीन बदलानंतर ३ हजार ऑन नेट तर १८०० ऑफ नेट मिनिट्स फ्री प्राप्त होईल. तत्पूर्वी, या पॅकमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगचा फायदा मिळत होता. मात्र, कंपनीने रोज २५० मिनिटची कॅपिंग ठेवली होती. फ्री मिनिट्स नंतर ग्राहकांना २० पैसे प्रति मिनिट याप्रमाणे पैसे द्यावे लागतील.

तथापि, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्या विना कोणत्याही एफयूपी लिमिटच्या अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग ऑफर करते. रिलायन्स जिओने ऑफ नेटवर्क कॉलिंग मिनिटसाठी कॅपिंगकडून ६ पैसे प्रति मिनिट चार्ज आकारते.

BSNL STV ३९५ या ७१ दिवसांची वैधता असलेल्या पॅक मध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. हा पॅक मुंबई आणि दिल्ली सर्कल सोडून सर्व टेलिकॉम सर्कल मध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही महानगरात BSNL च्या ऐवजी MTNL आपली सर्विस देत आहे.